बंद

वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

प्रकाशन दिनांक : 11/02/2021

औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका):  जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक मूल्य दर तक्ते सन 2021-22 तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

या बैठकीत नगर रचना मूल्यांकन विभागाचे सहाय्यक संचालक अ.वा. गोडघासे यांनी वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. खरेदी-विक्री व्यवहाराची अनुषंगिक माहितीच्या आधारे वार्षिक मूल्य दर तक्ते अद्यावत करण्यात येतात. वार्षिक मुल्य दर तक्ते 2021-22 तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे सहाय्यक संचालक नगर रचना मूल्यांकन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्व अनुषंगिक माहितीच्या आधारे निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी आदेशित केले.

बैठकीस सहायक जिल्हा निबंधक डी. व्ही. सोनावणे, नगर रचनाकार एफ.व्ही. नांदे, श्री. अनासपुरे, सहायक नगररचनाकार प्र. शा भोसले, प.पां.परिहार यांची उपस्थिती होती. 

वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक