बंद

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे एप्रिल व मे महिन्याचा लोकशाही दिन स्थगित

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

औरंगाबाद, दि.२८ (जिमाका) :- जिल्हा  स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०१९ निवडणूक कार्यक्रम आदर्श आचार संहिता १० मार्च २०१९ पासुन लागु केलेली असुन ती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २७ मे २०१९ पर्यंत लागु राहणार असल्याचे निर्देशित केलेले आहे.

शासन परिपत्रक दिनांक २६ सप्टेंबर २०१२ मधील नमुद तरतुदीनुसार ज्या ज्या क्षेत्रात निवडणुकीकरीता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे नमूद आहे. त्या अनुषंगाने आचार संहिता कालावधीत माहे एप्रिल व मे २०१९ महिण्याचा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे, जिल्हाधिकारी  कार्यालय, औरंगाबाद यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****