बंद

लोकशाही दिनात 6 अर्ज प्राप्त

प्रकाशन दिनांक : 02/02/2021

औरंगाबाद, दि. 1 (जिमाका):  जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेब्रुवारी महिन्याच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये 06 अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात  आयोजित केलेल्या लोकशाही दिनास उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रिता मैत्रेवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.जमादार, जिल्हा अग्रणी बँकेचे क्रांतीकुमार देशपांडे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक रगडे, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक एस.एस.दडपे, लघु आणि पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता किशोर शिखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एन.ए.बोर्डे, महावितरण ग्रामीण मंडळ कार्यालय, औरंगाबाद यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकशाही दिन हा नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी निकाली काढण्यासाठी घेतला जातो. नागरिकांच्या अडचणींवर योग्य मार्गदर्शन आणि त्या-त्या विभागाकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आणि जनतेमध्ये एक सकारात्मक आणि आश्वासनात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी वेळेत तक्रारीची दखल घेऊन तीस दिवसांच्या आत प्रकरणे निकाली काढणे अपेक्षित आहेत. याबाबत प्रत्येक विभाग प्रमुखांनी येणाऱ्या तक्रार अर्जांवर योग्य ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींची योग्य दखल घ्यावी, अशी सूचना विविध विभागाच्या प्रमुखांना अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी लोकशाही दिनात बोलतांना दिली.

या लोकशाही दिनात महसूल-3, पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण-1,  महावितरण-1 सार्वजनिक बांधकाम विभाग-1 असे एकूण 6 अर्ज निकाली काढण्यात आले.

लोकशाही दिनात 6 अर्ज प्राप्त