बंद

लोकवर्गणी जमा करण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची पूर्व परवानगी आवश्यक

प्रकाशन दिनांक : 19/08/2020

औरंगाबाद दि. 19 जिमाका – जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव साजरा करण्यासाठी इच्छुक मंडळाच्या पदाधिकारी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 वे कलम 41 (क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमाकरीता लोक वर्गणी (देणगी) जमा करावयाची असल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधकनकारक आहे. अशा परवानगी शिवाय (देणगी) वर्गणी जमा करणे बेकायदेशीर आहे. कलम 14 (क) ची परवानगी ही जिल्ह्याच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत ऑनलाईन अथवा ऑफलाईन (प्रत्यक्ष कार्यालयात) येऊन मिळविता येऊ शकते, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त म.स.बुधवंत यांनी कळविले आहे.
ऑनलाईन परवानगी करीता धर्मादाय आयुक्त विभागाचे www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मंडळाची नोंदणी करुन मिळविता येऊ शकते. ऑनलाईन परवानगीकरीता संकेत स्थळावर प्रणाली मार्गदर्शक या सदराखाली कलम 41 (क) ची परवानगीवर ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेची माहिती पाहिल्यास पीपीटी फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहे.
सर्व इच्छुक मंडळांनी आपआपल्या सोईप्रमाणे ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज लवकरात लवकर करावे व ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी. ज्या संस्था, संस्था नोंदणी अधिनियक 1860 किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियक 1950 अन्वये नोंदविण्यात आलेल्या असतील व त्यांचे उद्देशात गणेश उत्सव साजरा करणे हा असेल त्यांनी वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
ज्या मंडळांनी मागील वर्षी परवानगी घेतली असेल व उत्सव साजरा केला असेल त्यांनी मागील वर्षीचा हिशोब सादर करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे नवीन मंडळांनी अर्ज करतेवेळी त्या क्षेत्रातील महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ज्या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्याची अनुमती असल्याचे पत्र व जागा मालकाची ना- हरकत जोडणे बंधनकारक आहे.
सन 2020 चे परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. ही परवानगी 22 सप्टेंबर 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून देण्यात येईल याची सर्व मंडळांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी कळविले आहे.