लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी
प्रकाशन दिनांक : 23/07/2021
औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) –जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, पोलिस उपायुक्त सुरेश वानखेडे आदींनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
