बंद

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी आवाहन

प्रकाशन दिनांक : 19/01/2021

औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका): जलशक्ती मंत्रालय भारत सरकारव्दारे पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन होण्यासाठी देशातील यासंबंधी सर्व संसाधने व सर्व भागधारकांना प्रोत्साहीत करण्याच्या, त्यांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व नागरी स्वायत्त संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करणारे अशासकीय संस्था यांना राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये भाग घेण्यासाठी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये व्यक्ती व संस्थांना सहभागी होण्यासाठी व प्रोत्साहित करून सत्कार करण्याच्या उद्देशाने भूगर्भिय पाणी, पावसाच्या पाण्याची साठवण, पाण्याचा पुनर्वापर यासारख्या नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी जलसंसाधन व्यवस्थापनाची संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वांनी मार्गदर्शक सूचना व अर्जाच्या नमुन्याचे अवलोकन करून भाग घेण्यासाठी Central Ground Water Board (CGWB) केंद्रीय भूजल बोर्ड नोडल एजन्सीकडे www.mowr.gov.in किंवा www.cgwb.gov.in या वेबसाईटवर विहीत नमुन्यात अर्ज 10 फेब्रुवारी 2021 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.