बंद

राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत इंदिरा गांधी जयंती साजरी

प्रकाशन दिनांक : 19/11/2020

औरंगाबाद, दि.19 (जिमाका) :- देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

          सुरूवातीला इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस श्री. चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी त्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून इंदिरा गांधींना अभिवादन केले.

राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत इंदिरा गांधी जयंती साजरी