बंद

राज्य सेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी

प्रकाशन दिनांक : 02/03/2021

औरंगाबाद दि.01 (जिमाका) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर राज्य सेवा पूर्व परीक्षा -2020 14 मार्च 2020 रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी 10 ते 12  या वेळेत तर दुसरे सत्र दु. 3 ते 5 या कालावधीत घेणार असुन ही परीक्षा औरंगाबाद शहरातील 59 उपकेंद्रावर होणार आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी  आधार कार्ड, आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र  व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

          परीक्षा कक्षामध्ये 9.30 वाजेनंतर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमदेवारास परवानगी असणार नाही.

          उमेदवाराने त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्युटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेवून जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरीता बंदी घालण्यात येईल. परीक्षेकरिता नियुक्तकरण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 विषाणूच्या अनुषंगाने Extra Protective Kit, परीक्षेकरिता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकरीता Basic Covid Kit व फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांच्या वापराकरिता Personal Protective Equipment Kit आयोगा मार्फत पुरविण्यात येणार आहे.  परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परीक्षेसठी 19 हजार 646 उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली असून, या परीक्षेच्या कामासाठी 2167 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.