बंद

राज्य सेवा पूर्व परिक्षा दि.11 ऑक्टोबर रोजी

प्रकाशन दिनांक : 09/10/2020

औरंगाबाद, दि.08 (जि.मा.का.) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर जिल्हा राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 रविवार दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी दोन सत्रात सकाळी 10 ते 12 आणि सत्र 2 दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत 59 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

या परिक्षेसाठी 19656 उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली आहे. या परीक्षेच्या कामासाठी 2406 अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने आयोगाचे ओळखपत्र तसेच पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

परीक्षा कक्षामध्ये सकाळी 09.30 वाजेनंतर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमदेवारास परवानगी असणार नाही.

उमेदवाराने त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्युटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेवून जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरीता बंदी घालण्यात येईल. परिक्षा केंद्राच्या प्रवेशदारावरच परीक्षेच्या दिवशी उमेदवाराची तपासणी पोलीसामार्फत करण्यात येणार आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.