बंद

राज्यस्तरीय पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास मुदतवाढ

प्रकाशन दिनांक : 17/12/2020

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका): शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रिक्तपदांच्या भरतीसा 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर महारोजगार मेळाव्यास राज्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार व नियोक्ते (खाजगी आस्थापना) यांचा प्रतिसाद मोठ्याप्रमाणात प्राप्त झाल्याने रोजगार मेळाव्यास 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी जिल्हयातील पात्र उमेदवारांनी या ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना 20 डिसेंबर 2020 पर्यंत एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे. ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी केली नाही त्यांनी एम्प्लॉयमेण्ट टॅब वरील जॉब सीकर हा पर्याय निवडून नोंदणी करावी व त्यानंतर पात्रतेनुसार अप्लाय करावे. अप्लाय केलेल्या पदासाठी मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ याबाबतची माहिती उमेदवारांना एसएमएस, दूरध्वनी , ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.
याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0240-2334859 या क्रमांकावर संपर्क साधावा व या मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एन. एन. सूर्यवंशी यांनी केले आहे.