बंद

रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

प्रकाशन दिनांक : 20/10/2021

औरंगाबाद,दिनांक 19 (जिमाका) :  शहरातील सिडको बसस्टँड ते हर्सुल टी पॉइंटच्या रस्त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. पाहणी दरम्यान रस्त्याची कामे दर्जेदार करण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेले खड्डे तत्काळ बुजवावेत. त्याचबरोबर रस्त्यांची व्यवस्थित रोलिंग करून घ्यावी. मोठ्या खड्ड्यांमध्ये खडीचा वापर करण्यात यावा. दर्जेदार कामाबरोबरच वेळेत ते काम पूर्ण करावे जेणेकरुन सामान्य नागरिकांना सुविधा निर्माण होईल अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे (दक्षिण) शाखा अभियंता शेख अथरोद्दीन, सहायक अभियंता श्री.आनंदराव यांनी रस्त्यांबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांना सविस्तर माहिती दिली.