बंद

रब्बी हंगामात 175273 हेक्टरवर पेरणी व सर्व प्रकारच्या खतांची जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्धता – जिल्हाधि‍कारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 30/12/2020

औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : चालू रब्बी हंगामात 208000 हेक्टर इतक्या सरासरी रब्बी क्षेत्राच्या तुलनेत 175273 हेक्टरवर चालु हंगामात पेरणी झाली आहे. खरीप 2020 मध्ये युरियाच्या मागणीत झालेल्या अचानक वाढीच्या व झालेल्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभुमीवर रब्बी हंगामातील क्षेत्रामध्ये होणारी वाढ लक्षात घेवुन ऑक्टोबरच्या सुरवातीपासुनच रासायनिक खताच्या पुरवठा व विक्रीबाबत संनियंत्रण करण्यात आले. ऑक्टोबर 2020 मध्ये युरिया खताचा महाराष्ट्र कृषि उदयोग व विकास महामंडळामार्फत संरक्षित खताचा 763 मे.टन संरक्षित साठा करण्यात आला. तसेच जिल्हयाला प्राप्त्‍ आंवटनानुसार मुख्यत: युरियाचा पुरवठा होण्याबाबत सतत महिनानिहाय संनियत्रंण करण्यात आले. डिसेंबर, 2020 अखेर 22064 मे.टन आवंटनाच्या तुलनेत आज अखेर 27631 मे. टन पुरवठा पाठपुरावाअंती करुन घेण्यात आला आहे. याशिवाय इतर खतांचाही मागणीप्रमाणे पुरवठा होत असल्याची दक्षता घेण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खतांच्या उपलब्धतेबाबत बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक चव्हाण, कृभकोचे रामेशवर सावरगावे, इफकोचे एस.एन. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

 

जिल्हा

खताचे नाव

आवंटन रब्बी ऑक्टोबर ते डिसेंबर

सुरूवातीचे शिल्लक

प्राप्त

एकूण उपलब्ध

विक्री

शिल्लक

(आकडेवारी मे.टनमध्ये)

औरंगाबाद

युरिआ

22064

14808

27631

42439

14128

28310

 

डीएपी

3805

8177

2026

10204

3585

6619

 

एमओपी

2020

5093

298

5391

1403

3988

 

संयुक्त खते

27036

33435

16275

49709

21858

27852

 

एसएसपी

6769

11303

6856

18159

5729

12430

 

एकूण

61694

73472

53534

127007

47235

79772

सन 2019 च्या तुलनेत 2020 या वर्षात रब्बी हंगामामध्ये खताच्या उपलब्धतेत वाढ झाल्याची दिसुन येते. आज स्थितीचा आढावा घेऊन संरक्षित साठा खुला करण्यात आला आहे. सध्य स्थितीत बाजारात खतांची मागणी अंत्यत्‍ कमी आहे. खरीप हंगाम 2020 मध्येच अनेक शेतकऱ्यांनी खते खरेदी करुन ठेवल्याने असे चित्र पहावयास मिळत आहे. सद्यस्थितीत बाजारात खतांची मुबलक उपलब्धता असुन शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेप्रमाणे व विदयापिठाने शिफारस केलेल्या मात्रे एवढी खते माती परिक्षणअहवालानुसार खरेदी करुन वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले आहे.

युरियाच्या संनियंत्रणासाठी सर्वाधिक खरेदी करणाऱ्या खरेदीदारांच्या तपासणीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. जिल्हयात याबाबत तपासणी केली असता Real Time Basis वर खतांच्या विक्रीच्या नोंदी घेत नसल्याचे आढळुन आलेल्या 15 रासायनिक खत विक्रेत्यावर मागील महिनाभरात कारवाया करुन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.. विक्रेत्याने e-pos वर वेळेवर नोंदी घ्याव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी दिल्या. तर प्रत्येक खरेदीदार शेतकऱ्याने खत खरेदी करतांना सोबत आधार कार्ड घेवुन जावे म्हणजे विक्रेते वेळेत नोंद घेतील, असे आवाहनही त्यांनी केले.