बंद

मेल्ट्रॉनमध्ये मतमोजणीचा पूर्वआढावा; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

प्रकाशन दिनांक : 24/05/2019

औरंगाबाद, दि.21 (जि.मा.का.) :-  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि.23 रोजी सकाळी 8 पासून सुरू होणार आहे. मतमोजणीत ऐनवेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणी पूर्व तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी आज मेल्ट्रॉनमध्ये घेतला. तसेच आवश्यक त्या सूचनाही संबंधितांना दिल्या.

सिपेटमध्ये आज निवडणूक निरीक्षक ब्रजमोहन कुमार, देवेंद्र सिंग यांनी मतमोजणी प्रक्रिया राबवितांना घ्यावयाची काळजी, करावयाची कार्यवाही याबाबत मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनीही संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मतदार संघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

मतमोजणी प्रक्रिया 84 टेबलवर 26 फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, चोख पालीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, असेही श्री.चौधरी म्हणाले.

मेल्ट्रॉनमध्ये मतमोजणीचा पूर्वआढावा; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज