बंद

मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

औरंगाबाद, दि. ३० (जि.मा.का.) – औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील मतदान दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी होणार असल्याचे  भारत निवडणूक आयोग यांचेकडून जाहीर करण्यात आले आहे. सदर निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, या हेतूने दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी ५:१५ वाजता Run for democracy मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथून आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे  उपजिल्हा निवडणूक अधिकारी  निलेश श्रींगी यांनी कळविले आहे.

*******