बंद

मुद्रक, प्रकाशक,पक्ष,उमेदवारांवरनमुना मतपत्रिकेसाठी निर्बंध

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

औरंगाबाद, दि. ३१ (जिमाका) – आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही. निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने, त्यांच्या प्रतिनिधींनी  किंवा त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाच्या सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने, प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना उमेदवाराचे नाव, त्यांना नेमून दिलेले चिन्ह छापणे, नमुना मतपत्रिकेसाठी निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या कृती करण्यास आचारसंहिता संपेपर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश  कलम १४४ अन्वये पोलिस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे-घाडगे यांनी निर्गमित केले आहेत.

*****