बंद

मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, जिल्ह्यात आचारसंहिता लागू

प्रकाशन दिनांक : 14/12/2020

औरंगाबाद, दिनांक  12  (जिमाका) :  औरंगाबाद जिल्‍हयात 618 ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान आणि 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्‍यासाठी दिनांक 11 डिसेंबर 2020 पासून जिल्‍हयात आचारसंहिता लागू झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्‍या 07 ग्रामपंचायतींच्‍या तसेच माहे डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणा-या 611 असा एकूण 618 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे. ज्‍या जिल्‍हयात 50 टक्‍के किंवा त्‍याहून अधिक ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुका अशा संपूर्ण जिल्‍हयामध्‍ये आचार संहिता लागू राहील, असे निर्देश आहेत. त्‍यानुसार औरंगाबाद जिल्‍हयातील 865 ग्रामपंचायतींपैकी 618 ग्रामपंचायतींमध्‍ये निवडणुका असल्‍यामुळे संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहील.

सदर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्‍या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्‍यांची छाननी दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशन पत्रे दिनांक 04 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्‍याच दिवशी निवडणूक‍ चिन्‍हे वाटप होईल. मतदान दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वा. ते सायं.5.30 वा. या वेळेत होईल. मतमोजणी दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी होईल. विधानसभा मतदारसंघाची दिनांक 25 सप्‍टेंबर 2020 रोजी अस्तित्‍वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राहय धरण्‍यात येणार आहे. त्‍यानुसार तयार करण्‍यात आलेल्‍या ग्रामपंचायतींच्‍या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या दिनांक 01 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दिनांक 07 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्‍यात आली होती. त्‍यानुसार अंतिम मतदार याद्या दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्‍द केल्‍या जाणार आहेत, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

निवडणूक कार्यक्रम

अ.क्र.

निवडणुकीचे टप्‍पे

 दिनांक

तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक

दिनांक १५/१२/२०२० (मंगळवार )

नामनिर्देशन पत्रे मागविण्‍याचा व सादर करण्‍याचा दिनांक व वेळ ( नमुना अ अ मध्‍ये नमूद केलेल्‍या ठिकाणी)

दिनांक २३/१२/२०२० (बुधवार) ते दिनांक ३०/१२/२०२० (बुधवार) वेळ सकाळी ११.०० ते दुपारी ३.००       (दिनांक २५, २६, व २७/१२/२०२० ची सार्वजनिक सुट्टी वगळून)

नामनिर्देशन पत्र छाननी करण्‍याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्‍ये नमूद केलेल्‍या ठिकाणी)

दिनांक ३१/१२/२०२० (गुरूवार) वेळ सकाळी ११.०० वाजल्‍यापासून छाननी संपेपर्यंत

नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचा दिनांक व वेळ (वेळ (नमुना अ अ मध्‍ये नमूद केलेल्‍या ठिकाणी)

दिनांक ०४/०१/२०२१ (सोमवार) दुपारी ३.०० वाजे पर्यंत

निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवाराची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक व वेळ

दिनांक ०४/०१/२०२१ (सोमवार) दुपारी ३.०० वाजे नंतर 

आवश्‍यक असल्‍यास मतदानाचा दिनांक

दिनांक १५/०१/२०२१ (शुक्रवार) सकाळी ७.३० वा.पासून ते सायं.५.३० वाजेपर्यंत

मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्‍हाधिका-यांच्‍या मान्‍यतेने तहसीलदार निश्‍चीत करतील त्‍यानुसार राहील)

दिनांक १८/०१/२०२१ (सोमवार)

जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्‍या निकालाची अधिसुचना प्रसिध्‍द करण्‍याचा अंतिम दिनांक

दिनांक २१/०१/२०२१ (गुरूवार) पर्यंत