बंद

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 18/11/2021

औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत नवनवीन उद्योगांना चालना देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्योग विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी संदर्भात बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे व उद्योग केंद्राचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पारंपरिक व्यवसायांबरोबरच सूक्ष्म परंतु नवनवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले. आजच्या बैठकीत उद्योगांच्या एकूण 416 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. शिवाय अर्जदाराने किमान कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक असल्याने यासंबंधीची कार्यवाही चोखपणे पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. त्याचबरोबर बँकेने उद्योगांना केलेला पत पुरवठा याबाबतही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आढावा घेतला. तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक कारागीरांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत समितीपुढे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये महिला प्रवर्गामध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडे 132 आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडे 26 असे एकूण 158 प्रस्ताव दाखल झाले. त्याच्रप्रमाणे एस.सी, एस.टी प्रवर्गातून जिल्हा उद्योग केंद्राकडे 160 आणि खादी ग्रामोद्योग मंडळाकडे 29 असे एकूण 189 प्रकरणे दाखल झाली. शिवाय विविध व्यवसायांसाठी एकूण 416 प्रकरणे दाखल झाली, त्यास जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मंजुरी दिली. बैठकीत श्री. रोकडे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा