बंद

‘मिशन बिगेन अगेन’मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 05/04/2021

·        नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी

·        विविध विभागांच्या पथकांची नियुक्ती

औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) :-  सध्याची कोविडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेलमधील तरतुदी 15 एप्रिल पर्यंत लागु केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.         ‍ि

          महाराष्‍ट्र शासनाच्‍या Mission Begin Again च्‍या गाईडलाईन्‍सची जिल्‍हयामध्‍ये अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयात  जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  1 एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्‍यात आली होती.  यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, नोडल अधिकारी श्रीमंत हारकर तसेच संबंधित अधिाकरी उपस्थित हेाते.

          बैठकीच्या सुरूवातीला जिल्‍हाधिकारी यांनी महाराष्‍ट्र शासनाचे Mission Begin Again या आदेशातील सर्व नियमांचे सविस्‍तर सादरीकरण करुन कोविड-19 आपत्‍ती काळात नियम न पाळणा-या नागरिकांवर करण्‍यात येणा-या  कारवाईबद्दल माहिती दिली.

            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, Mission Begin Again आदेशाची अंमलबजावणी करतांना कोविड-19 काळात नियमांचे पालन न करणा-या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी वॉर्डनिहाय्य तसेच ग्रामीण भागात बाजाराची गावे शोधून तिथे पथक नेमण्‍यात यावे. सदरील पथकात  जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे 2 व पोलीस प्रशासनाचा 1 कर्मचारी असे प्रत्‍येकी 3 पर्यवेक्षक असावेत. तसेच पाच पथकांसाठी एक निरीक्षक असावा. महानगरपालिकेतील गर्दीच्‍या तसेच संवेदनशील वॉर्डमध्‍ये आवश्‍यकतेप्रमाणे 4 पर्यवेक्षकांचे पथक असावे ज्यामध्ये 1 कर्मचारी हा महानगर पालिकेचा असेल. प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही दोन पथके तयार करावीत. प्रत्येक पथकांमार्फत कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणा-या  दैनंदिन किमान 100 वाहनांवर कारवाई करावी. रीक्षामध्‍ये प्रत्‍येकी दोनच प्रवासी असावेत, महामंडळाच्‍या बसेस, खासगी टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍या या सर्वांना 50 टक्‍के प्रवासी बसवणे याबाबत सुचना देण्‍यात याव्‍यात.  राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने आपल्‍या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची 5 पथके तयार करावीत. प्रत्येक  पथकांनी शहरातील राज्‍य उत्‍पादन शुल्‍क च्‍या अखत्‍यारीतील दुकाने राञी वेळेत बंद होण्‍याच्‍या अनुषंगाने व कोविड प्रतिबंधित नियमांचे पालन करयासंबंधीत कारवाई करावी तसचे नियमांचे पालन न करणा-या दैनंदिन किमान 10 आस्‍थापनांवर कार्यवाही करण्‍यात यावी. अन्न व औषध प्रशासनाने शहरातील सर्व हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट्स राञी 8 नंतर फक्‍त Take Away पद्धतीने चालू राहतील. तसेच इतर वेळी हॉटेल आसनक्षमतेच्‍या फक्‍त 50 टक्‍के क्षमतेने चालू राहतील याबाबत लक्ष ठेवावे नियमांचे पालन व्‍हावे यासाठी अन्‍न व औषध प्रशासनाने तीन पथके गठीत करुन नियमांचे पालन न करणा-या दैनंदिन प्रत्येकी किमान 20 आस्‍थापनांवर कारवाई करावे असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी आदेशित केले.