आमच्याबद्दल थोडेसे
२०१७ मध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात MAHAIT (DIT) अंतर्गत जिल्हा प्रशासनाला व MAHAIT ला ई-गव्हर्नन्स साठी सहाय्य करण्यासाठी IT सेलची स्थापना करण्यात आली. जसे कि भारत नेट, महा नेट, अर्बन महा नेट, राज्य स्तरावरील वाइड एरिया नेटवर्क, आपले सरकार तक्रार प्रणाली, नागरिकांच्या आधार कार्ड च्या समस्या सोडविण्यासाठी सहाय्य करणे, इत्यादी.
श्री. शरद दिवेकर, १ एप्रिल २०१९ पासून MAHAIT (DIT) अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (DPM) म्हणून कार्यरत आहेत.
कामाबद्दल थोडेसे…
- जिल्ह्यातील महानेट आणि अर्बन महानेट प्रकल्पाची अंमलबजावणी पार पाडणे.
- जिल्हा स्तरावरील MSWAN नेटवर्क हाताळणे.
- नागरिकांच्या आधार कार्ड च्या समस्या सोडविण्यासाठी सहाय्य करणे.
- आपले सरकार तक्रार प्रणाली.
- जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरन्स चे नियोजन करणे व तांत्रिक साहाय्य करणे.
- जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या विविध कामांची अंमलबजावणी करणे.
संपर्क
संपर्क: ०२४०-२३३४५०१