बंद

माय बापाचे छत्र हरवेल्या चार बालकांना प्रशासनाकडून मायेचा आधार

प्रकाशन दिनांक : 05/07/2021

औरंगाबाद, दि. 2 (जिमाका) – सिल्लोड तालुक्यातील मौजे उंडनगाव येथे 30 जून 2021 रोजी संगिता व संतोष पाडळे या दाम्प्त्याने घरगुती वादातून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेची संवेदनशिलपणे तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या घटनेतील बालकांना मदत करण्याचे निर्देश संर्व संबंधित यंत्रणांना दिले. त्यानूसार महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बालकाची गृहभेट घेऊन कौटुंबिक पार्श्वभूमिची माहिती घेऊन बालकांना मानसिक आधार दिला. तसेच नातेवाईकांनाही आधार देऊन शासकीय योजना संलग्नित करण्याचे सुनिश्चित करण्यात आले. चारही बालके निराधार व अनाथ असल्याने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या बालगृहामध्ये प्रवेशित करून त्यांचे संपूर्ण संगोपण केले जाणार आहे.

तसेच जिल्हा कृती दलाच्या मार्फत बालकांना सर्वोतोपरी मदत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बालकल्याण समिती औरंगाबाद यांनी देखील सदर बाबीचे गांर्भिय लक्षात घेऊन बालकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन बालकांचे सर्वांगिन आयुष्य सुरक्षित करण्यात येणार आहे. सध्या कुटुंबातील असलेल्या सर्व अडचणी समजून घेऊन तातडीची मदत बालकांना देण्यात येत आहे. या बालकांना आवश्यक ते सहकार्य व गृहभेटी इत्यादी बाबतीत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, संरक्षण अधिकारी (संस्थात्म्क) श्रीमती कल्पना मोहिते, सामाजिक कार्यकर्ता दिपक बाजारे यांच्या संपर्कात असून सहकार्य करत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.