बंद

मातंग समाजातील इच्छुकांनी कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 22/09/2020

औरंगाबाद, दि.22 (जिमाका) : –  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा मातंग समाजातील 18 ते 50 वयोगटातील इच्छुकांनी 50 हजार प्रकल्प मर्यादा असलेल्या अनुदान योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव 14 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किसन पवार यांनी केले आहे. प्रस्ताव नमुना (कर्ज मागणी अर्ज) www.slasdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,

प्रस्ताव कार्यालयीन वेळेत सादर करावेत. प्रस्तावासोबत जात, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, शिधापत्रिकांची झेरॉक्स प्रत, व्यवसाय दरपत्रक (कोटेशन), दोन पारपत्र आकारांचे छायाचित्र, रहिवाशी प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे स्वसांक्षांकित करुन शहरातील शिवाजी शाळेच्या बाजूला असलेल्या खोकडपुऱ्यातील सामाजिक न्याय भवनातील महामंडळाच्या कार्यालयात सादर करावेत. असेही त्यांनी कळवले आहे.