बंद

माजी सैनिकांसाठी मार्गदर्शन शिबिर

प्रकाशन दिनांक : 06/08/2020

औरंगाबाद,दि.5 (जिमाका) – माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने जे माजी सैनिक आगामी पोलीस भरतीसाठी ईच्छुक आहेत, त्यांच्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद अंतर्गत पोलीस भरतीविषयी येणाऱ्या अडीअडचणी, लेखी परीक्षा व एसबीआय डिफेन्स  खाते व त्यावरील उपलब्ध असलेल्या कर्जावरील सुविधा या विषयी मार्गदर्शन शिबिराचे  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद येथे 9 ऑगस्ट  रोजी सकाळी  10.30 वाजता  आयोजन केले आहे. सदर शिबिराचा जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घावा, असे जिल्हा सैनिक कल्याण आधिकारी यांनी कळविले आहे.