माजी सैनिकांनी डीएसपी सुविधा घेण्यात बाबत आवाहन
प्रकाशन दिनांक : 20/08/2020
औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : माजी सैनिकांनी बँकेच्या वेतन, पेंशन खात्यास डीएसपी (Defence Salary Package) सुविधा घ्यावी. यासाठी स्वत:च्या वेतन किंवा सिंगल पेन्शन खाते क्र. संयुक्त खात्याशी जोडून घ्यावे. सदर डीएसपी सुविधांसाठी सुरुवातीचा (Initial) PPO किंवा E PPO, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुकचे पहिले पान खाते क्र. नमूद (स्वत : चे Single/ Salary DSP Acct पेन्शन खाते ), पासबुकचे पहिले पान ज्यात खाते क्र . नमूद (जॉइंट खाते) या कागदपत्रांच्या छायांकित प्रत स्व सांक्षांकित करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना जिल्हा सैनिक कार्यालयात उपलब्ध आहे. सदर अर्ज आपापल्या संबंधित एसबीआय बँक व्यवस्थापक यांच्या नावाने जिल्हा सैनिक कार्यालयास सादर करावा. या सुविधेचा सर्व माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.