बंद

महाशिवरात्री उत्सवानिमित्त जिल्हादंडाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित

प्रकाशन दिनांक : 12/03/2021

औरंगाबाद, दि.10, (जिमाका) :- शासनाने  कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, 13 मार्च 2020 पासुन लागु करुन यातील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. शासन व जिल्‍हास्‍तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. परंतु सध्‍या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव विचारात घेता दिनांक 11 मार्च 2021 “महाशिवरात्री ” उत्‍सवानिमित्‍त शासन परिपत्रकान्‍वये मार्गदर्शक सूचना विहित करण्‍यात आलेल्‍या आहेत.

       महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्‍सवांपैकी एक मोठा उत्‍सव मानला जातो. 12 ज्‍योतीर्लिंगांपैकी औरंगाबाद जिल्‍हयामध्‍ये घृष्‍णेश्‍वर या ठिकाणी व जिल्‍हयातील इतर विविध शिवमंदीरांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. परंतु यावर्षी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद यांनी  फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार औरंगाबाद जिल्‍हयासाठी (पोलिस आयुक्‍त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळुन) 11 मार्च 2021  रोजी साजरा होणा-या “महाशिवरात्री ” उत्‍सवानिमित्‍त औरंगाबाद जिल्‍हयातील सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे सुचना निर्गमित केल्या आहे.

अ.क्र.

काय करावे

काय करु नये

 

01

1.     कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने कोणत्‍याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्‍या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात येऊ नये.

 

2.     

02

3.   महाशिवरात्री उत्‍सव यावर्षी साधेपणाने साजरा करावा, सर्व मंदिर विश्‍वस्‍त /व्‍यवस्‍थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही व सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे.

4.   

भाविकांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी शिवमंदिराच्‍या ठिकाणी गर्दी करु नये.

03

5.  भाविकांनी घरात राहुनच पूजाअर्चा करावी, यासाठी प्रशासनाकडून स्‍थानिक लो‍कप्रतिनिधी तसेच स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या साहाय्याने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना व जनजागृती करणे आवश्‍यक आहे.

भाविकांनी घरीच राहून पूजाअर्चा करावी व पूजेसाठी बाहेर जाणे टाळावे.

04

6.   प्रत्‍येक शिवमंदीराच्‍या आतील बाजूस सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होण्‍याच्‍या दृष्‍टीने एकावेळी फक्‍त 50 भाविक दर्शन घेतील, यादृष्‍टीने संबंधित विश्‍वस्‍त /व्‍यवस्‍थापक यांनी योग्‍य त्‍या उपाययोजना कराव्‍यात

ज्‍येष्‍ठ नागरीक व लहान मुलांनी मंदिरात दर्शनासाठी येवू नये.

05

7.  मंदीर व्‍यवस्‍थापनाने आजूबाजूच्‍या परीसरात निर्जंतुकीकरणाची व्‍यवस्‍था, सोशल डिस्‍टन्सिंग व स्‍वच्‍छतेचे नियम (मास्‍क, सॅनिटायझर इ.)चे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.

स्‍थानिक प्रशासनाने महाशिवरात्रीच्‍या दिवशी मंदिराच्‍या परिसरात हार व फुले विक्रेते यांची गर्दी होऊ देवू नये.

06

8.   संबंधित स्‍थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्‍वरुपाचे मंडप उभारण्‍यात यावे, शिवमंदिरातील व्‍यवस्‍थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्‍यादी व्‍दारे उपलब्‍ध करुन द्यावी.

भाविकांनी स्‍वतःहून मास्‍कचा वापर करावा तसेच सोशल

डिस्‍टन्सिंग व अनुषंगिक नियामांचे उल्‍लंघन करु नये.