बंद

महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.नरेश गीते रुजु

प्रकाशन दिनांक : 28/08/2020

औरंगाबाद,दि.२७,(जिमाका)- महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यामुळे त्या पदावर डॉ. नरेश गीते,(भा.प्र.से )यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाची सुत्रे डॉ. नरेश गीते,(भा.प्र.से ) यांच्या कडे सुपूर्द केली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार,दि.२७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या दालनात वरीष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. नरेश गीते यांच्याकडे सहव्यवस्थापकीय संचालक पदाची सुत्रे जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सुपूर्द केली.

महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.नरेश गीते