बंद

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

प्रकाशन दिनांक : 04/10/2020

औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) –  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून महापुरूषांना अभिवादन केले.