• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

मतमोजणी केंद्रास विभागीय आयुक्तांनी दिली भेट चोख व्यवस्था ठेवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

प्रकाशन दिनांक : 19/11/2020

औरंगाबाद, दि.19 (जिमाका) :- आौरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या शहरातील मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. येथील मतमोजणी केंद्रातील व्यवस्थेची पाहणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच मतमोजणी केंद्रावर सर्व व्यवस्था उत्तम, चोख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.

          पाहणी दरम्यान श्री. केंद्रेकर यांच्यासमवेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत आदींची उपस्थिती होती.

          श्री. केंद्रेकर यांनी मतमोजणी केंद्रावर सर्व साहित्य उत्तम दर्जाचे असावे. गुणतत्तापूर्ण कामे करण्यात यावीत. अग्नीशमन यंत्रणेने तत्काळ पाहणी अहवाल सादर करावा. त्याचबरोबर अधिकारी – कर्मचारी यांची भोजन, बैठक व्यवस्था उत्तम असावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. शिवाय मतमोजणी केंद्राच्या संपूर्ण परिसराची पाहणी करत योग्य त्या सूचनाही केल्या.

मतमोजणी केंद्रास विभागीय आयुक्तांनी दिली भेट चोख व्यवस्था ठेवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश