बंद

मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम घोषित

प्रकाशन दिनांक : 26/08/2020

औरंगाबाद,दि.26 (जिमाका) – 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून सदर वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

     दावे व हरकती निकाली काढणे – दि. 27 ऑगस्ट 2020 (गुरूवार) पर्यंत, मतदार यादीची तपासणी करणे आणि अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यास परवानगी प्राप्त करणे – दि. 7 सप्टेंबर 2020 (सोमवार) पर्यंत, डेटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे – दि. 18 सप्टेंबर 2020 (शुक्रवार) पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रकाशन – दि. 25 सप्टेंबर 2020 (शुक्रवार), असे सुनील चव्हाण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.