बंद

मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांना आवाहन

प्रकाशन दिनांक : 12/02/2021

औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका): 108 औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, परंतु फोटो नाही अशा मतदारांनी, त्यांचा फोटो व त्यांचा सध्याचा रहिवासी पुरावा 20 फेब्रुवारी 2021 रोजी पर्यंत तहसिल कार्यालय, औरंगाबाद येथील निवडणूक शाखेत आणून द्यावा. नसता, सदर मतदार हे स्थलांतरीत झाल्याचे समजून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी फिरून मतदारांचे रंगीत छायाचित्र जमा करण्याचे काम करत आहे, तरी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन 108 औरंगाबाद पश्चिम संघाचे मतदान नोंदणी अधिकारी मंदार वैद्य  यांनी केले आहे.

108-औरंगाबाद पश्चिम व‍ि‍धानसभा मतदार संघात 8133 मतदारांचे मतदार यादीत नाव आहे,  परंतु फोटो नाही. अशा मतदारांचे फोटो गोळा करणेबाबत, निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना घरोघरी फिरून मतदाराचे फोटो जमा करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. तरी मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांनी, तहसील कार्यालयात फोटो आणून देणेबाबत, बीएलओ मार्फत त्यांना नोटीस दिलेली आहे. तसेच संबंधित मतदान केंद्रांवर फोटो नसलेल्या मतदारांची यादी डकवून, तहसिल कार्यालयात फोटो आणून देण्याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर फोटो नसलेल्या मतदारांची यादी, प्रसिद्ध करून, मतदारांनी फोटो सादर करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.