बंद

मतदार जागृतीसाठी रविवारी सायकलेथॉन स्पर्धा नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 20/04/2019

औरंगाबाद, दिनांक १९ (जि.मा.का.) – औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे.  यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, या हेतूने रविवार, दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ६ वाजता लोकशाहीसाठी धाव (Run for democracy) सायकलेथॉन स्पर्धेचे आयोजन जिल्हा प्रशासन आणि ब्लॅक बक्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

सायकलेथॉन स्पर्धेची सुरूवात क्रांती चौक येथून होणार आहे.  या सायकलेथॉनमध्ये १५० सायकलस्वार सहभागी होतील. ते मतदान करण्याबाबत जागृती करणार आहेत. क्रांती चौक येथे जिल्हाधिकारी उदय चौधरी या सायकलेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवतील. सायकलेथॉनचा मार्ग क्रांती चौक येथून सिडको बसस्टॅड-हर्सूल टी पाँईट-जिल्हाधिकारी कार्यालय-बसस्थानक-बाबा पेट्रोल पंप येथून क्रांती चौक येथे समारोप होईल.  

या सायकलेथॉन स्पर्धेत नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी  निलेश श्रींगी यांनी केले आहे.

*******

मतदार जागृतीसाठी रविवारी सायकलेथॉन स्पर्धा नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन