बंद

मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

            औरंगाबाद,दि.२७ (जिमाका)–औरंगाबाद जिल्ह्यामधील निवडणुकीच्या मतदान केंद्र परिसरात मतदान केंद्रावर गैरप्रकार  टाळण्याच्या दृष्टिकोनातून मतदान केंद्राजवळच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल घेवून जाण्यास व ध्वनीक्षेपके बंद ठेवणे आवश्यक असल्याने  फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हा आदेश दि. २३.०४.२०१९ पासून मतदान संपेपर्यंत  लागू राहील, असे आदेश जिल्हाधिकारी, औरंगाबाद शहर  यांनी  जारी केले आहे.

*****