बंद

मतदान केंद्राचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध

प्रकाशन दिनांक : 30/11/2020

 

औरंगाबाद,दि.(जिमाका)- ०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील “औरंगाबाद जिल्हयातील पदवीधर मतदारांना” त्यांचे मतदान केंद्र व मतदान केंद्र इमारतीचा तपशील  कळावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 जिल्हा निवडणूक विभागाने  मुख्य निवडणूक अधिकारी यांचेमार्फत उपलब्ध करुन दिलेली लिंक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://aurangabad.gov.in/05-aurangabad-division-graduate-constituency-election-2020/ या संकेतस्थळावर ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० अंतर्गत “आपले मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता शोधा “या शिर्षकावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे  निवडणूक विभागाने कळवले आहे.