बंद

मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा – उदय चौधरी एमजीएम कम्युनिटी रेडिओतर्फे मतदारांमध्ये जागृती मतदान करण्याची हजार मतदारांनी घेतली शपथ

प्रकाशन दिनांक : 18/04/2019

 

औरंगाबाद, दि.१२, (जि.मा.का.) :- प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. प्रत्येकाने येत्या २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे. इतरांनाही मतदान करण्याबाबत जागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज युवकांना दिले.

एमजीएम कम्युनिटी रेडिओच्यावतीने मतदारांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने युवक, प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाची शपथ देण्यात आली. यामध्ये जवळपास एक हजार मतदारांनी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही उपस्थित मतदार, विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने मतदान करावे, ते प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहेच. त्यातूनच बळकट लोकशाही निर्माण होण्यास मदत होते.  मतदान करण्याबाबत इतरांनाही त्यांच्या या हक्काबाबत सांगावे. समाजात जागृती निर्माण करावी, असे आवाहनही श्री. सिंघल यांनी केले.

या कार्यक्रमास एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ.अपर्णा कक्कड, जलतज्ज्ञ एच.एम.देसरडा, डॉ.पी.वाय.कुलकर्णी, ॲड.एस.के.कदम, एमजीएमच्या जनसंवाद व वृत्तपत्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.रेखा शेळके, रेडिओ कम्युनिटी सेंटरच्या कार्यक्रम प्रमुख अश्विनी दाशरथे आदींची उपस्थिती होती.

*****

मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा - उदय चौधरी