मका खरेदी साठी अंतिम मुदत ही 30 जुलै किंवा राज्याचे उद्दिष्ट पुर्ण झाल्यास मक्का खरेदी बंद
प्रकाशन दिनांक : 28/07/2020
औरंगाबाद दि. 28, (जिमाका)- पणन हंगाम 2019 -20 रब्बीमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य मक्का खरेदीची अंतिम मुदत 30 जुलै किंवा त्यापूर्वी जर मका खरेदी उदिष्ट पुर्ण झाल्यास त्या संदर्भातील पोर्टल बंद झाले तर 30 जुलै च्या पूर्वी सुद्धा मक्का खरेदी बंद होईल. यापुढे मक्का खरेदी साठी मुदतवाढ मिळणार नसल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील मक्का आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की ,ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि ज्यांना खरेदी-विक्री संघामार्फत एसएमएस पाठविण्यात आले आहेत, त्या एसएमएस मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 30 तारखेच्या पूर्वी आपली मका खरेदी केंद्रावर घेऊन विक्रीसाठी यावे. जर महाराष्ट्र शासनाने दिलेले उद्दिष्ट 30 जूलै पूर्वी संपले तर त्यापूर्वी सुद्धा मका खरेदी बंद होईल. यादरम्यान कुठल्याही नवीन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात करण्यात येणार नाही. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये7832 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, 5714 शेतकऱ्यांना एसेमेस पाठवले आहेत. त्यापैकी आजपर्यंत 3463 शेतकऱ्यांची 1,02,020 क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे,असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी सांगितले.
