भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या सूचना
प्रकाशन दिनांक : 07/12/2020
औरंगाबाद, दिनांक 4 (जिमाका) – फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलिस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळुन) 06 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हयातील सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढीलप्रमाणे जनतेला सूचना केल्या आहेत.
अ.क्र. |
काय करावे |
काय करु नये |
|
1. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करावे. |
कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सुचना व नियमांचे उल्लंघन करण्यात येवु नये. |
02 |
2. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव पाहता महापरीनिर्वाण दिनाचा कार्यक्रम पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा. |
सदर कार्यक्रम करताना गर्दी करु नये. |
03 |
कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर चैत्यभूमी, दादर येथील कार्यक्रमांचे दूरध्वनीवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी दादर येथे न जाता घरातुनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
|
शासनाच्या सूचनेनुसार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, दादर येथे जावू नये. |
04 |
महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोविड संसर्गाचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपुर्वक व धैर्याने वागावे. तसेच घरी राहुनच परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. |
परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात होणा-या गर्दीवर निर्बंध घालण्यात येवुन शासन नियमांचे उल्लंघन करु नये. |
05 |
परमपूज्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करताना शासन नियमांनुसार शारीरीक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) पालन करुन आरोग्यविषयक, सार्वजनिक व सामाजिक संदेश असलेल्या जाहीराती प्रदर्शित कराव्यात व सॅनिटाईजरची व्यवस्था करावी. |
ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदीचे उल्लंघन करण्यात येवु नये.
|