बंद

ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आदेश

प्रकाशन दिनांक : 16/04/2021

औरंगाबाद दि 15 (जिमाका): जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबादचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथ रोग अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्‍वये  औरंगाबाद जिल्ह्यात (पोलिस आयुक्‍त औरंगाबाद (शहरयांचे कार्यक्षेत्र वगळून)  दिनांक 01 मे, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाअखेर संचारबंदी लागू राहणार असल्याचे आदेशाव्दारे कळविले आहे.

 या आदेशातील खालील नमूद इतर सर्व बाबी हया संपुर्ण औरंगाबाद जिल्‍हयासाठी (शहरासह) लागू राहतील.

  सदरील आदेश अंमलात असतांना पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. त्‍याचप्रमाणे अत्‍यावश्‍यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधीत राहिल. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यास्तव औरंगाबाद महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधीत वार्डाचे वार्ड अधिकारी व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधीत अधिकारी, तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्‍त लॉकडाऊन पर्यवेक्षक/मंडळ अधिकारी/अव्‍वल कारकून यांना संबंधीत पोलीस हवालदार व त्‍यापेक्षा वरीष्‍ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षीतपणे नेमलेले अधिकारी/कर्मचारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी आणि महसूल अधिकारी/कर्मचारी या आदेशाची नोंद घेऊन त्‍याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत दक्षता घेतील व आवश्‍यक कार्यवाही करतील. उपरोक्‍त अधिकारी/कर्मचारी यांना पोलीस ठाणे प्रमुखांशी समन्‍वय ठेवून संपूर्ण लॉकडाऊन आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीस /संघटना /आस्‍थापना विरुध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍यास व अनुषंगिक दंडात्‍मक कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधीकृत करण्‍यात येत आहे.

 

महानगरपालिका हद्दीत

महानगरपालिका, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके   गठीत करावीत.तसेच महाराष्‍ट्र   शासनाचे इतर विभाग जसे अन्‍न व औषध प्रशासन, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग, परिवहन  विभाग, पुरवठा विभाग इत्‍यादींचे अधिकारी यांचा पथकामध्‍ये समावेश  राहिल. या  संबंधात    जिल्‍हाधिकारी यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे या इतर विभागांचे अधिकारी कार्यवाही करतील.

नगरपालिका/नगरपंचायत हद्दीत 

नगरपालिका/नगरपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत

करावीत.

गावपातळीवर

ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.

 

          वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander)/ सहायक पोलीस आयुक्‍त यांचेकडे सादर करावे. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander) / सहायक पोलीस आयुक्‍त यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी  असेल.

              सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्‍द  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्‍यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.

 

1)   फौजदारी प्रक्रिया संहिता (Cr.P.C.)कलम 144 आणि रात्र संचारबंदी लागू करणे :

(Imposition of Section 144 and Night Curfew)

  • औरंगाबाद जिल्हयामध्ये दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजी रात्री 8.00 वाजलेपासून दिनांक 01 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यत कलम 144  लागू करणेत येत आहे.
  • कोणत्याही नागरिकांस सार्वजनिक ठिकाणी योग्य कारण असल्याशिवाय फिरण्यास  प्रतिबंध असेल.
  •  या आदेशामध्ये नमूद केलेल्या व सूट देणेत आलेल्या अत्यावश्यक सेवा / आस्थापना यांच्या व्यतिरिक्त सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, सेवा या बंद राहतील.
  • या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असलेल्या सेवा आणि आस्थापना यांना सूट देणेत आलेली असून त्यांच्या  दळण वळण व प्रक्रिया सुरू ठेवणे विषयी कोणतेही बंधन असणार नाही. 
  • या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अपवादात्मक वर्गवारीमध्ये समाविष्ठ केलेल्या सेवा आणि आस्थापना यांना कामाच्या दिवशी सकाळी 7.00 वा. ते रात्री 8.00 वा. या दरम्यान सुट देणेत आलेली असून त्यांच्या दळण वळण व प्रक्रिया सुरू ठेवणे विषयी नमूद केलेल्या कालावधीमध्ये प्रतिबंध असणार नाही.
  • अपवादात्मक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या वाहन चालक , घरेलू कामगार यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्‍यासाठी स्थानिक प्रशासनाची (महानगर पालिका, नगर पालिका,नगरपंचायत, ग्रामपंचायात )  परवानगी घेणे आवश्यक राहील.

 

2)  अत्यावश्यक सेवेमध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल –

  • रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्‍सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे    
    निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि    वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत  कच्चा माल उद्योग आणि अनुषंगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल.
  • शासकीय व खाजगी  पशुवैद्यकीय सेवा,  दवाखाने, पशु संगोपन केंद्र व  पशु खादयाची दुकाने.
  • किराणा सामानाची  दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई / चॉकलेट / केक/ खाद्य/‍मटन, चिकन, अंडी, मासे इ. दुकाने.
  • शितगृहे आणि साठवणुकीची गोदाम सेवा 
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
  • स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा.
  • स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा .
  • रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा
  • सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था , स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ
  •  दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी
  •  मालाची / वस्तुंची वाहतूक.
  •  पाणीपुरवठा विषयक सेवा
  • शेती संबंधित सेवा आणि शेतीशी निगडीत सर्व कामामध्ये सातत्य राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्व अनुषंगीक सेवा, बी-बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचाही समावेश असेल.
  • सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची व उत्‍पादनाची आयात – निर्यात
  •  ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत)

 

  • मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा
  • पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा 
  • सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
  • डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा   सेवा 
  • शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा 
  • विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा
  • ATM’s
  • पोस्टल सेवा 
  • कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)                                     
  • अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग
  • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा
  • सर्व ऑप्‍टीकल्‍स् शॉप.
  • वाहतूक व्‍यवस्‍थेशी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्क शॉप, सर्व्‍हीस सेंटर व स्‍पेअर्स पार्ट विक्री आस्‍थापना .

 

वर नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्ती / अंमलबजावणी संस्था यांनी खालील सर्व समावेशक तत्वांचे पालन करणे आवश्यक राहिल.

1)    सर्व अंमलबजावणी करणारे अधिकारी / प्राधिकरण यांनी प्रतिबंध हे लोकांच्या आवागमनशी संबंधित आहेत, परंतु वस्तु आणि मालाची आवक जावक नेहमीप्रमाणे सुरू राहिल याची नोंद घेणेत यावी.

2)   या आदेशात नमूद केलेल्या सेवा देणाऱ्या कामगारांच्या आवागमना साठी या आदेशात 1 मध्ये नमूद केले नुसार वैध राहतील.

3)   अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळ काळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जातील. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक सेवा या अत्यावश्यक सेवा समजल्या जातील हे तत्व लक्षात ठेवावे.

3)  या आदेशात नमूद केलेनूसार अत्यावश्यक सेवामध्ये समाविष्ठ सर्व दुकाने यांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे : (Essential Category)

  • अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाच्या  ठिकाणी दुकान मालक व दुकानामध्ये काम करणारे सर्व कामगार वर्ग तसेच सर्व ग्राहक यांनी संबंधित दुकान परिसरामध्ये कोव्हीड19 योग्य वर्तनाचे Covid Appropriate Behavior (CAB) उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल.
  • अत्‍यावश्यक सेवा देणारे दुकांनाचे मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकारत लवकर लसीकरण करून घेणेत यावे. सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधताना सुरक्षा उपायांचे जसे की, पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय जसे की, फेसशिल्ड व ग्राहकांकडून ई पेमेंटद्वारेच रक्कम स्वीकारणे इत्यादीचे पालन करणेत यावे.
  • अत्यावश्यक सेवामध्ये काम करणारे दुकानमालक, कामगार वर्ग किंवा कोणताही ग्राहक कोव्हीड उपाययोजनांचे पालन करत नसल्याचे निर्दशनास आल्यास त्यांचेकडून प्रथम अपराधासाठी रक्कम रुपये 500/- दंड वसूल केला जाईल. तसेच दुकान आस्थापना यांचेकडून कोव्हीड उपाययोजनांचे भंग झालेस दुकान आस्थापनेकडून रक्कम रुपये 1000/- दंड वसूल केला जाईल. पुन्हा – पुन्हा नियमांचे भंग करत असल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित आस्थापना ही कोव्हीड -19 आपत्ती अधिसूचना संपेपर्यत बंद करणेत येईल.
  • अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्‍ट असलेल्या आस्थापनामध्ये सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या आवागमन या आदेशात 1-ब मध्ये नमूद केलेनुसार वैध राहतील.
  • या आदेशामध्ये 2- मध्ये नमूद केलेनूसार किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात लोक एकत्र येत आहेत अशा  ठिकाणाबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य ती अनुषांगिक उपाययोजना करून तसेच       त्यांच्या चालू राहणेच्या वेळा निश्चित करून देणे. कायमस्वरूपी त्या ठिकाणी नसलेल्या वरील सेवाबाबत खुल्या सार्वजनिक जागा शोधून त्या ठिकाणी त्यांना सेवा देणेबाबत जागा नेमून देता येतील. स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा ची ठिकाणे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होणार नाहीत, याबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. स्थानिक प्रशासनास आवश्यकता भासल्यास वरील सेवाबाबत काही सार्वजनिक ठिकाणे ही कायमस्वरूपी बंद करता येतील.
  • सद्यस्थितीत  बंद असलेल्‍या सर्व दुकानाचे चालक / मालक तसेच कर्मचारी यांचे लसीकरण भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार करुन घेण्‍यात यावे. सदर आस्‍थापनांनी भविष्‍यात दुकाने सुरु करण्‍याच्‍या दृष्‍टीने कोविड-19 संदर्भात सुरक्षा  उपाययोजना म्‍हणून  पारदर्शक काच अथवा इतर साहित्‍यांचे कवच तसेच  ऑनलाईन पेमेंट सुविधा  इत्‍यादीद्वारे ग्राहकांशी कमीत कमी संपर्क येईल याबाबत पूर्वनियोजन करावे.

 

3.1               )   भाजीपाला, फळे व अन्‍नधान्‍य यासाठी समन्‍वय अधिकारी म्‍हणून खालील अधिका-यांची नेमणूक    

         करण्‍यात येत आहे.

अ.क्र.

Covid-19 निरीक्षक

पद

मोबाईल क्रमांक

01

श्री.  अनिल दाबशेडे

जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था,  औरंगाबाद

9545775555

02

डॉ. तुकाराम मेाटे

जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद

9422751600

03

श्री. सखाराम पानझडे

शहर अभियंता, महानगरपालिका औरंगाबाद

9823074025

 

 

4)    सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था – (Public Transport)

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खालील निर्बधांचे पालन करत, पूर्ण क्षमतेने सुरू राहिल.

ऑटो रिक्षा

चालक + फक्त 2 प्रवासी

टॅक्सी ( चारचाकी वाहन)

चालक + वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 % (प्रादेशिक परिवहन विभागाकडील नियमानुसार )

बस

प्रादेशिक परिवहन विभागाकडील नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतके प्रवासी .

कोणत्याही परिस्थितीत उभा राहून प्रवास करणेस प्रवाशांना परवानगी असणार नाही.

 

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी काटेकोरपणे योग्य पध्दतीने मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लघंन करणारे प्रवासी रक्कम रुपये 500/- दंडास पात्र राहतील. 
  • चारचाकी टॅक्सी मध्ये जर एखाद्या प्रवाशांने मास्क वापरला नसेल, नियमांचे उल्लघन करणारा तो प्रवासी आणि चालक हे प्रत्येकी रक्कम रूपये 500/- दंडास पात्र राहतील.
  • प्रत्येक वेळी प्रवास पूर्ण करून आलेल्या वाहनांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहिल.
  • सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे भारत सरकारकडील निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्‍यावे. महारा  शासनाने निर्गमित केलेल्‍या कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे /Covid Appropriate Behavior (CAB)  चालक यांनी त्‍यांच्‍या व प्रवासी यांचेमध्‍ये प्लास्टिक शिट लावून स्‍वतःला आयसोलेट करावे.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत कर्मचारी वर्गाच्या आवागमन या आदेशामध्ये 1-मध्ये नमूद केलेनुसार  वैध राहतील.
  • रेल्वेबाबत, रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यामधून उभा राहून प्रवास करणार नाहीत, आणि सर्व प्रवासी मास्क वापरतील याची खात्री करावी.
  • रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मास्क न वापरणे, कोव्हीड उपाययोजनांचे पालन न केलेस रक्कम रुपये 500/- दंड आकारला जाईल.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवणेबाबत यापूर्वी काही अटीवर परवानगी देणेत आलेली आहे. सदरबाबत सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था सुरळीत राहणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेशी निगडीत अनुषांगिक सेवा यांचाही यामध्ये समावेश करणेत येत आहे. विमानतळावर आवश्यक असलेल्या मालवाहतूक, तिकिट व्यवस्था या अनुषंगिक  सेवांचाही यामध्ये समावेश असेल.
  • ज्या व्यक्ती रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील, त्यांना  अधिकृत तिकिट स्वत: जवळ बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत विमानतळ / बसस्थानक / रेल्वे स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.

अ.क्र.

Covid-19 निरीक्षक  

पद

मोबाईल क्रमांक

01

श्री.संजय मेत्रेवार 

प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

9892318225

02

अरुण  शिया

विभागीय नियंत्रक, म.रा.प.म.औरंगाबाद

9420182745

 

5)  सुट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना : (Exemption Category)

           5.1) खालील नमूद कार्यालये ही सूट देणेत आलेल्या वर्गवारीमध्ये समाविष्ठ असतील

  • केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानिक प्राधिकरणे व संस्था 
  • सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम
  • अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये
  • विमा आणि मेडीक्लेम कार्यालये
  • औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत.
  • रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया यांचेमार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI,पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये