बंद

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 28/10/2020

औरंगाबाद, दि.28 (जिमाका) :  बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी लाभार्थ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येते. सन 2020-21 साठी योजनेस रु. 303.64 लक्ष नियतव्यय मंजूर असला तरी 33 टक्के नुसार योजना राबविण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. या योजनेतून 2020-21 या वर्षासाठी या योजनेतून लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन आवेदने करुन योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि सभापती एल. जी. गायकवाड यांनी केले आहे.

 इच्छुक लाभार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करुन त्याची एक प्रत पंचायत समिती  स्तरावर सादर करावे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.