बंद

बालकांच्या काळजी व संरक्षण कृती दलाचा अप्पर जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

प्रकाशन दिनांक : 10/08/2021

औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) :  कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गठित करण्यात आलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षण कृती दलाचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पात्र लाभार्थींना लाभ देण्याच्या सूचनाही यावेळी अधिका-यांना केल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातील या आढावा बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जी.एस. पुंगळे, महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पोलिस आयुक्तालयाच्या किरण पाटील, पोलिस उपअधीक्षक एस.एस. केंद्रे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. ए मुरंबीकर आदींसह महिला व बाल संरक्षण अधिकारी, बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बैठकीत कृती दलाचाी संरचना, बालगृहे, बालगृहातील बालकांची तपासणी, कोविड 19 मुळे मृत्यू पावलेल्या एक, दोन्ही पालकांची संख्या, बालसंगोपन योजना, कोविड काळात विधवा झालेल्या विधवा महिला, अनाथ बालकांचे प्रमाणपत्र आदींबाबत श्री. पुंगळे यांनी माहिती सादर केली.