बंद

बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विरुध्द फौजदारी कार्यवाही

प्रकाशन दिनांक : 09/10/2020

औरंगाबाद,दि, 08 :- (जि.मा.का.) ट्रॅम्पोलिन व टंबलिंग क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबत पाच टक्के आरक्षणांतर्गत 262 प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे, निकालाच्या आधारे पडताळणी केलेली आहे. 1998 ते 2005 कालावधीत विभागीय उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथे महाराष्ट्र ॲमॅच्युअर ट्रॅम्पोलीन असोसिएशन यांचे नावे स्पर्धाचे बनावट दस्त सादर करणाऱ्या व्यक्तीविरुध्द फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश क्रीडा आयुक्तांनी दिले असल्याचे क्रीडा उपसंचालक, उर्मिला मोराळे, यांनी कळविले आहे.