• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

बकरी ईद  साध्‍या पध्‍दतीने साजरी करण्‍याबाबत जिल्हाधिकारी यांच्याव्दारे मार्गदर्शक सूचना जारी

प्रकाशन दिनांक : 19/07/2021

                   औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका): कोविड -19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची बकरी ईद 2021  साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याच्‍या अनुषंगाने शासनस्तरावरुन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट आटोक्‍यात येत असतानाच केंद्रीय कृती गटाने कोविड-19 ची तिसरी लाट येत्‍या काही दिवसांत येण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यादृष्टीने दिनांक 21 जूलै 2021 रोजी साजरा होणा-या बकरी ईद-2021 (चंद्र दर्शनावर अवलंबून ) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत.

                   त्यानुसार औरंगाबाद जिल्‍हयातील सर्व जनतेला बकरी ईद-2021 साजरा करण्‍याबाबत काय करावे आणि काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांच्याव्दारे निर्गमित करण्‍यात आल्या  आहेत. तसेच शासनाकडून लागू करण्‍यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्‍यामध्‍ये बकरी ईद निमित्‍त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.

अ.क्र.

काय करावे

काय करु नये

01

1.  कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महानगरपालिका, संबंधित पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे.

2. कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने कोणत्‍याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्‍या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात येऊ नये.

 

02

3. बकरी ईदची नमाज नागरिकांनी आपल्‍या घरीच करावी.

 

4.   बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा करु नये

 

03

5. जनावरांचे बाजार बंद राहतील,नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्‍यास त्‍यांनी ऑनलाईन पध्‍दतीने अथवा दूरध्‍वनीद्वारे जनावरे खरेदी करावी.

बकरी ईदच्‍या निमित्‍ताने नागरिकांनी कुठल्‍याही सार्वजनिक ठिकाणी जनावरे खरेदीसाठी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

04

6. नागरिकांनी शक्‍यतो प्रतिकात्‍मक कुर्बानी करावी.

    

7.   नागरिकांनी शक्‍यतो प्रतिकात्‍मक कुर्बानी करताना गर्दी करु नये व सोशल डिस्‍टन्सिंगच्‍या नियमांचा भंग करु नये.

 

05

8.   बकरी ईदच्‍या दिवशी सोशल डिस्‍टन्सिंग व स्‍वच्‍छतेच्‍या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्‍क, सॅनिटायजर इ.) पालन  करावे.

9.रात्रीची संचारबंदी असल्‍यामुळे संचारबंदीच्‍या काळात नागरिकांनी विनाकारण रस्‍त्‍यावर फिरु नये.

बकरी ईद  साध्‍या पध्‍दतीने साजरी करण्‍याबाबत जिल्हाधिकारी यांच्याव्दारे मार्गदर्शक सूचना जारी