बंद

फटाका परवान्यासाठी 2 नोव्हेबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 21/10/2020

औरंगाबाद, दि. 21(जिमाका) : चालू वर्षातील दिपावली उत्सव 2020 साठी तात्पुरता फटाका परवाना देण्याची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पैठण- फुलंब्री मुख्यालय औरंगाबाद कार्यालयामार्फत अनुसरण्यात येत आहे.

पैठण व फुलंब्री तालुक्यातील नागरिक व व्यावसायिकांनी तात्पुरता फटाका परवाना मिळविण्यासाठी विहित नमून्यातील अर्ज, अर्जासोबत संबंधित नगरपालिका/ग्रामपंचायत/ बाजारपेठ व संबंधित पोलीस स्टेशनचे/ अग्नीशमन दल यांचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेचा नकाशा, विक्री कर खात्याकडून दिपावली उत्सव 2020 साठी भरणा केल्याबाबतचे चलन प्रत, तसेच या कार्यालयामार्फत भरणा करण्यासाठीचे चलन 3 प्रतीमध्ये इत्यादी फुलंब्री व पैठण तहसील कार्यालयात अथवा उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पैठण- फुलंब्री मुख्यालय कार्यालयात दि. 21 ऑक्टोबर, ते 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत. 

दि. 5 नोव्हेबर, 2020 रोजी संबंधितांना दिपावली उत्सव 2020 साठी तात्पुरता फटाका परवाना देण्यात येईल. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नागरिक व व्यावसायिकांनी  नोंद घ्यावी, असे आवाहन स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पैठण –फुलंब्री मुख्यालय औरंगाबाद यांनी केले आहे.