बंद

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध v हरकती, सूचना 15 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन  

प्रकाशन दिनांक : 19/11/2020

          औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 01.01.2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर कार्यक्रमानुसार दिनांक 01.01.2021 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी औरंगाबाद जिल्ह्यातील 09 विधानसभा मतदारसंघांतर्गत सर्व मतदान केंद्रावर, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इ. ठिकाणी दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

          प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दि. 17 नोव्हेंबर 2020 ते दि. 15 डिसेंबर 2020 या कालावधीत हरकती व सूचना मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे सादर करू शकतात.

          तरी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव, घराचा पत्ता, फोटो, वगळणी स्थलांतरीत इ. बाबत हरकती व सूचना असल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे दिनांक 15 डिसेंबर 2020 पुर्वी सादर करण्याबाबात सुनील चव्हाण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, औरंगाबाद यांनी आवाहन केले आहे.

          तसेच दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतीम मतदार यादीनुसार एकुण मतदारांची संख्या 2884823 इतकी होती, त्यामध्ये आज रोजी वाढ होऊन ती 2887223 इतकी झालेली आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात मतदान केंद्राची एकुण संख्या 2892 इतकी होती त्यामध्ये 86 ने घट होऊन मतदान केंद्राची संख्या 2806 इतकी झालेली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.