बंद

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 08/09/2020

औरंगाबाद, दि.08 (जिमाका) :- प्रत्येक मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी आणि बालकांचे मृत्यू टाळता यावे म्हणून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 60 हजार महिलांना सदरील योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ हा थेट हस्तांतरण पद्धतीने (Direct Beneficiary Transfer मार्फत) त्यांच्या वैयक्तीक बँक/पोस्ट ऑफिस खात्यावर जमा करण्यात येतात. सदर योजना सध्या ग्रामीण क्षेत्राबरोबरच नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे, असे डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात येत आहे. ही योजना शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना असुन यामध्ये पहिल्या जिवंत बाळाकरिता गरोदर मातेस बुडीत मजुरीचा लाभ म्हणुन रू.5000/- देण्यात येतात. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र आहे. योजना सुरू झाल्यापासून आज पर्यंत 60744 महिलांच्या खात्यात हा निधी जमा झाला आहे. पहिल्या आपत्यासाठी गरोदर मातांना पाच हजारांची मदत तीन टप्प्यात अदा केली जाते. पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची लवकर 100 दिवसाच्या आत नोंदणी करताच 1000/- दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यानंतर परंतू किमान गरोदरपणास एक तपासणी झाल्यानंतर रू. 2000/- व तिसऱ्या टप्प्यात तिसरा हप्ता बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर-बाळाला 14 आठवड्यापर्यंत किमान बी.सी.जी., ओ.पी.व्ही., डी.पी.टी/पेन्टाहॅलेंट आणि हिपॅटायटीसचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर रू. 2000/- अखेरचा टप्पा दिला जातो. या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ हा थेट हस्तांतरण पद्धतीने (Direct Beneficiary Transfer मार्फत) त्यांच्या वैयक्तीक बँक/पोस्ट ऑफिस खात्यावर जमा करण्यात येतात. सदर योजना सध्या ग्रामीण क्षेत्राबरोबरच नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ही मदत मोलाची ठरली आहे, असे डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांनी कळविले आहे.