बंद

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 4 हजार 874 शेतकरी कुटूंबाच्या खात्यात रक्कम जमा पैसे खात्यावर जमा होण्याची प्रक्रीया सुरू उर्वरीत नावे नोंदविण्याचे काम युध्दपातळीवर

प्रकाशन दिनांक : 27/02/2019

 

            औरंगाबाद, दि.26 (जिमाका)  – शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असुन या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकरी कुटुंबास प्रतीवर्ष 6 हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पात्र कुटूंबांच्या अंतिम करुन संकेत स्थळावर अपलोड करण्यात येत आहेत.  आज दि. 26 फेब्रुवारी, 2019 रोजीच्या स्थितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील 2 लाख 20 हजार 846 पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती PM-KISAN पोर्टलवर आपलोड करण्यात आले असुन जिल्ह्यातील इतर पात्र शेतकरी कुटंबांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम गतीने करण्यात येत आहे. 

            औरंगाबाद जिल्ह्यांतर्गत आर्थिक सहाय्य वितरणासाठी प्रमाणित केलेल्या पहिल्या बॅचमध्ये एकुण 4  हजार 874 लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला असुन ऑनलाईन पडताळणी आधारे बॅचनिहाय ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य पात्र लाभार्यांण च्या खात्यामध्ये वितरण करण्यात येत आहे.

***