बंद

पैठण येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने डिसीएचसी सुविधा सुरु करावी – रोहयो मंत्री संदीपान भूमरे

प्रकाशन दिनांक : 26/04/2021

औरंगाबाद,दि.26 (जिमाका) –  कोरोनाच्या वाढत्या  संसर्गात ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पैठण येथील घाटी अंतर्गत असलेल्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने कोरोना रुग्णांसाठी डिसीएचसी उपचार सुविधा सुरु करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी आज येथे दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात  या संर्दभात घेण्यात आलेल्या बैठकीत  श्री.भूमरे यांनी याबाबत निर्देश दिले.यावेळी  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ,घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, पैठणचे उपविभागीय अधिकारी  स्वप्नील मोरे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

रोहयो  मंत्री श्री.भूमरे यांनी ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून पैठण येथील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्याच ठिकाणी आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने कोरोना रुग्णांसाठी डिसीएचसीच्या माध्यमातून उत्तम उपचार सुविधा उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांची स्थानिक ठिकाणी सोय होईल. त्याच सोबत औरंगााबाद मधील वाढत्या रुग्ण संख्येच्या परिस्थितीत पैठण तालुक्यातील स्थानिक भागातील इतर रुग्णांसाठीही  पर्यायी उपचार सुविधा तयार होईल,असे सांगूण पैठण येथे घाटीच्या अतंर्गत असललेल्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तीस ऑक्सीजन खाटांचे डिसीएचसी तातडीने सुरु करावेत. त्यासाठीचे आवश्यक मनुष्यबळ,इतर सुविधां तत्परतेने उपलब्ध करुन दयाव्यात,असे निर्देश श्री.भूमरे यांनी यावेळी संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी तातडीने पैठण येथे प्रशिक्षण केंद्रात डिसीएचसी सुविधा तयार करण्यात येईल,त्यासाठी मनुष्यबळासह सेंट्रल ऑक्सीजन व्यवस्था तसेच ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात येईल,असे यावेळी सांगितले.