बंद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 01/10/2020

औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) :  निर्यातक्षम व विष भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेस राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्याने एक रोपवाटीका उभारण्याचा लक्षांक आहे. पात्र लाभार्थी महा डी बीटी (maha DBT) किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे  2 ते 19 ऑक्टोबर 2020 दरम्यान अर्ज करु शकता, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,यांनी कळविले आहे.

अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हक्टर जमिन असणे आवश्यक आहे. तसेच रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. लाभार्थी निवडीमध्ये महिला कृषि पदविधारकांना प्रथम प्राधान्य तर महिला गट/ महिला शेतकरी द्वितीय प्राधान्य राहील, भाजीपाला उत्पादनक अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील.

योजने अंतर्गत रोपवाटीका पुर्णपणे नव्याने उभारावयाचे आहे. या घटकांतर्गत यापुर्वी शासनाचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटीकाधारक, लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटीकाधारक तसेच कोणत्याही शासकीय योजनेतुन शेडनेट व हरीतगृह घटकांचा लाभ घेतलेले लाभार्थी पुन:श्च सदर योजनेत लाभास पात्र राहणार नाही. योजना प्रकल्प स्वरुपात राबवायची असल्याने 3.25 मी. उंचीचे 1000 चौ.मी शेडनेट, प्लास्टिक टनेल 1000 चौ.मी पावर नॅपसॅक स्प्रेअर 1 व प्लॉस्टिक क्रेटस 62 हे चारही घटक एकाच ठिकाणी उभारणे बंधनकारक राहील. रोपवाटीकेचा प्रकल्प खर्च रु 4.60/- लक्ष असून अनुदान 50 टक्के नुसार महतम रु. 2.30/- लक्ष देय राहील.

रोपवाटीकेसाठी आलेल्या अर्जाची छाननी ज्येष्ठता सुची  व सोडत प्रक्रिया 20 ते 30 ऑक्टोंबर 2020 पर्यत करण्यात येईल. पुर्वसंमती देण्याचा कालावधी 2 ते 6 नोव्हेंबर असेल. प्रकल्पाची उभारणी 9 नोव्हेंबर पासून पुढे 3 महिने कालावधीत राहील. काम पूर्ण झाल्यावर मोका तपासणी केली जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.