बंद

पावित्र्य राखून मंदिराचा जीर्णोध्दार करणार – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशन दिनांक : 11/10/2021

औरंगाबाद, दि.08, (जिमाका) :- प्राचीन मंदिर पुनर्विकास योजनेत खंडोबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येणार असून या करिता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे समिती मार्फत संपूर्ण अभ्यासपूर्ण पावित्र्य राखून जीर्णोध्दार करण्यात येणार असल्याचा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला.

येथील सातारा परिसरातील पुरातन हेमाडपंथी खंडोबा मंदिराची पाहणीच्या वेळी श्री.देसाई बोलत होते. यावेळी आमदार संजय शिरसाठ, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे यांची उपस्थिती होती.

प्राचीन मंदिर पुनर्विकास योजनेमध्ये शासनाने राज्यातील आठ मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला असून या पहिल्या टप्प्यात खंडोबा मंदिराचा समावेश असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, योग्यवेळी आणि अधिकृतपणे खंडोबा मंदिराचा समावेश झाल्याने ग्रामस्थांकरिता विशेष आनंदाची बाब आहे. जिर्णोध्दार ग्रामस्थांचा विश्वास संपादन करुन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कडेपठार ते मंदिर असा 9 कि.मी. रस्ता देखील करावा अशा सूचना संबंधितांना देत मंदिराचा इतिहास जाणून घेत मंदिर व परिसराची पहाणी श्री.देसाई यांनी यावेळी केली.

पावित्र्य राखून मंदिराचा जीर्णोध्दार करणार