बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 12/02/2021

औरंगाबाद (जिमाका) दि. 11:- उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

सोमवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.50 वा. विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. औरंगाबादमध्ये आगमन. सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.आर. आय. व सीटी स्कॅन यंत्रांचे लोकार्पण. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील कोविड योद्ध्यांचा सत्कार. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत मोठे सिंचन प्रकल्पांसाठी सन 2020-21 कालवा सल्लागार समितीची बैठक. स्थळ: विश्वेश्वरॉय हॉल, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, जालना रोड, औरंगाबाद. दुपारी 3.30 ते 4 वाजेपर्यंत जिल्हा वार्षिक योजना, सन 2021-22 (सर्वसाधारण) राज्यस्तर बैठकांचा सुधारीत कार्यक्रम. सायं. 5 वा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ. स्थळ: शहागंज चमन. सायं. 5.30 ते 7 वाजेपर्यंत राखीव. रात्रौ मुक्काम.

16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.20 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.