पालकमंत्री सुभाष देसाई यांचा दौरा कार्यक्रम
प्रकाशन दिनांक : 14/01/2021
औरंगाबाद (जिमाका) दि. 14 :- उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. रांजणगाव येथे आगमन. सकाळी 10.15 ते 11 वाजेपर्यंत फियाट कंपनी भेट. सकाळी 11.30 ते 12.30 वाजेपर्यंत रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनच्या नवीन वास्तुचा उद्घाटन कार्यक्रम. दु. 1 ते 1.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंत रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उद्योजकांसमवेत बैठक. दु. 2.15 वा. रांजणगाव येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण. दु. 3 वा. औरंगाबाद येथे आगमन. दु. 3.30 ते 5 पर्यंत राखीव. सायं. 5 ते 7 वाजेपर्यंत बैठका. रात्री मुक्काम.
शनिवार, दि. 16 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9.30 वा. चिकलठाणा कचरा प्रक्रिया लोकरार्पण (150MT). सकाळी 10 वा. कांचनवाडी येथे बायोगॅस प्रक्रिया केंद्र (30TDI क्षमता) आणि UNDP Dry Waste केंद्राचे लोकार्पण कार्यक्रम. सकाळी 10.30 रेल्वेस्टेशनजवळ 100 बस थांबे (स्मार्ट सिटी) आणि आऊट डोअर डिस्प्ले लोकार्पण आणि बस व भुमिपूजन. सकाळी 11 वा. घाटी रुग्णालय वार्डातील बेडचे लोकार्पण. दु. 3.30 ते 5.30 औरंगाबाद शहरातील विविध लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 ते 7 औरंगाबाद शहरातील विविध प्रतिष्ठित व्यक्तीसमवेत चर्चा. रात्री 7 ते 8 राखीव. रात्री 8 वा. औरंगाबाद येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.