बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण

प्रकाशन दिनांक : 17/09/2020

औरंगाबाद, दि. 16: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी सकाळी 09 वाजता औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभा जवळ पार पडणार आहे.

सकाळी 8.45 वाजता पालकमंत्री सुभाष देसाई यांचे सिद्धार्थ उद्यानात आगमन होईल. सकाळी 8.45 ते 9 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण व मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यात येईल. 9 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. सकाळी 9.02 ते 9.10 वाजता पालकमंत्री नागरिकांना शुभेच्छा संदेश देतील. सकाळी 9.10 ते 9.20 यावेळेत निमंत्रितांना भेटतील. सकाळी 9.20 वाजता पालकमंत्री यांचे सिद्धार्थ उद्यानातून प्रयाण होईल.

तरी या समारंभास राष्ट्रीय पोषाखात कार्यक्रमापूर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.